सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (12:51 IST)

Road Accident :पालघरमध्ये भीषण बस अपघातात 50 प्रवासी जखमी

पालघरातील विक्रमगड तालुक्यात आलोंडे पाडा येथील राईस मील जवळ दोन एसटी बसचा भीषण अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे.या अपघातात 50 प्रवासी जखमी झाले आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.यात काही प्रवासी किरकोळ तर काही गंभीररीत्या जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे.

या अपघातात दोन्ही बस अमोर समोर धडकल्या आहेत.या अपघातात दोन्ही बस मधील 50 प्रवासी जखमी झाले आहे.त्यांना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात एका सीसीटीव्ही कैमऱ्यात कैद झाला असून अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे.आज सकाळी 9 च्या सुमारास विक्रमगड वरून वाड्याला जाणारी डहाणू-ठाणे-सातारा आणि वाड्याकडून येणारी जव्हार -वाडा बस कोकणी पाडा येथील राईस मिल जवळ धडकल्या.