गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्यातील रस्ते अपघातांमधील मृत्यूंमध्ये मोठी घट

गेल्या वर्षीच्या तुलनेत  रस्ते अपघातांमधील मृत्यूंमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये (जानेवारी ते सप्टेंबर) रस्ते अपघातातील मृतांचा आकडा ५ हजारांनी घटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ते सुरक्षा समितीला राज्य सरकारांनी दिलेल्या माहितीमधून ही सकारात्मक आकडेवारी समोर आली आहे.
 
रस्ते अपघातांमधील मृतांची आकडेवारी राज्य सरकारांनी दिलेल्या माहितीवरुन समोर आली आहे. टक्केवारीचा विचार केल्यास यामध्ये पंजाब पहिल्या स्थानावर आहे. पंजाबमधील रस्ते अपघातात मृत पावलेल्यांचे प्रमाण १४.४ टक्क्यांनी कमी झाले आहे. तर त्यानंतर पश्चिम बंगालचा (१३.७ टक्के) क्रमांक लागतो. अपघातातील मृतांचा घटलेला आकडा लक्षात घेतल्यास महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षातील पहिल्या तीन तिमाहींचा (जानेवारी ते सप्टेंबर) विचार करता, यंदाच्या वर्षात महाराष्ट्रात रस्ते अपघातातील मृतांची संख्या ८०७ ने कमी झाली आहे. यानंतर गुजरात (७७५) दुसऱ्या क्रमांकावर आहे.