मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (07:54 IST)

रोहित पवार यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे

rohit panwar
सध्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपकडून  ही निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून यासाठी नकार देण्यात आला आहे. या सर्व घडामोडींवर लक्ष देता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांना या पोटनिवडणूक बिनविरोध व्हाव्यात यासाठी एक पत्र लिहिले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार  यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "राज ठाकरेंनी स्वतःची स्टाईल जपली पाहिजे," असा टोला लगावला आहे.
 
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "अंधेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले, तेव्हा राज ठाकरेंनी सर्व पक्षीय नेत्यांना पत्र लिहले होते. पण पंढरपूर, नांदेड आणि कोल्हापूरच्या निवडणुकांवेळी त्यांनी पत्र लिहिले नाही. हा भेदभाव का करण्यात आला? हे फक्त तेच सांगू शकतात. त्यांचे भाषण आणि आधीच्या स्टाईलचा मीही चाहता आहे. पण सध्या त्यामध्ये आता कुठेतरी बदल होताना दिसतो. भाजपचा प्रभाव राज ठाकरेंवर पडत असून ही गोष्ट अनेकांना भावत नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:ची स्टाईल जपली पाहिजे. भाजपच्या नादी लागलेले पक्ष असो अथवा व्यक्ती दोन्ही संपले आहेत."
Edited by : Ratnadeep Ranshoor