शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (21:21 IST)

रुपाली ठोंबरे पाटील यांचा श्रीकांत शिंदेंना खोचक टोला-बच्चू ये तेरे बस की बात नाही

rupali patil
शिंदेपुत्र खासदार श्रीकांत यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित दादांवर पलटवार केला. त्यावर, आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी श्रीकांत शिंदेंना खोचक टोला लगावला आहे.
 
'आपण बोलू नका, थोडी सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवून टीका करा. आपण कोणावर टीका करतो याचं भान ठेवावं अन्यथा महाराष्ट्रात हाहाकार माजेल. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. तेव्हा अजितदादांवर बोलताना थोड आचपेच ठेवून बोला." अजितदादांवर बोलण्यासाठी तुमच्या पप्पांना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगा. बच्चू ये तेरे बस की बात नाही, असे म्हणत रुपाली पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांना चांगलेच फैलावर घेतले.