दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असं समजू नका, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं वक्तव्य
महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणात सुमारे २.०७ कोटी मतदारांचे गणनापत्र जमा होऊ शकले नाहीत.
तसेच महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी स्पष्ट केले आहे की, विशेष सखोल पुनरिक्षण (SIR २०२६) प्रक्रियेदरम्यान समोर आलेले सुमारे २ कोटी ७ लाख मतदार कायमचे बाद झालेले नाहीत. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी ही केवळ एक तात्पुरती 'मसुदा यादी' असून यामध्ये राहिलेल्या त्रुटी सुधारण्याची संपूर्ण संधी नागरिकांना उपलब्ध आहे.
निवडणूक आयोगाच्या पडताळणीत हे २.०७ कोटी मतदार 'Uncollectable Enumeration Forms' (गोळा न होऊ शकलेले फॉर्म) या श्रेणीत आले होते.
दोन कोटी मतदारांचे वर्गीकरण काय आहे?निवडणूक आयोगाच्या पडताळणीत हे २.०७ कोटी मतदार 'Uncollectable Enumeration Forms' (गोळा न होऊ शकलेले फॉर्म) या श्रेणीत आले होते.
७६.८० लाख मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले आहे.
२.०७ कोटी मतदारांची विभागणी:
अनुपस्थित/सापडले नाहीत: ७५.५२ लाख
कायमस्वरूपी स्थलांतरित: ७६.८० लाख
मृत: ३४.८१ लाख
दुबार/इतरत्र नोंदणी: १७.६३ लाख
इतर: २.२३ लाख
मुख्य निवडणूक अधिकारी काय म्हणाले?
सर्वात मोठी गैरसमजूत म्हणजे या २.०७ कोटींना कायमचे हटवले गेले असे समजणे. सुमारे १७ लाख मतदारांची नावे दोन ठिकाणी होती, त्यामुळे एका ठिकाणची नोंद काढली तरी दुसरीकडे नाव राहू शकते. मृत मतदारांची नावे काढणे म्हणजे यादी शुद्ध करणे आहे.
ही प्रारूप यादी आहे, अंतिम नाही. दावे व आक्षेप प्रक्रिया सुरू राहील. प्रत्येक मतदाराने स्वतःची नाव तपासावी. नाव नसल्यास फॉर्म ६ भरून समावेशासाठी अर्ज करावा. दुरुस्तीसाठी फॉर्म ८, तर आक्षेपासाठी फॉर्म ७.
बीएलओंनी किमान एकदा (आणि न सापडल्यास तीनदा) भेट दिली होती. शहरी भागात काही व्यावहारिक अडचणी असू शकतात (उदा. लोक उशिरा घरी येणे).
मतदारांनी काय करावे?
नाव ऑनलाइन तपासा: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन मसुदा यादीत तुमचे नाव तपासा. तुमचे नाव गहाळ असल्यास किंवा दुरुस्ती करायची असल्यास ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत अर्ज सादर करा. यादीतून नाव वगळले गेले असल्यास फॉर्म ६ (Form 6) भरून पुन्हा नावाचा समावेश करण्यासाठी अर्ज करा. नावाचे स्पेलिंग, पत्ता किंवा इतर दुरुस्त्यांसाठी फॉर्म ८ (Form 8) ऑनलाइन किंवा स्थानिक बीएलओ (BLO) कडे जमा करा
अंतिम मतदार यादी: आलेल्या सर्व अर्जांची छाननी करून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्याची अंतिम आणि अचूक मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. तसेच शहरी भागातील नोकरदार किंवा इतर कारणांमुळे तात्पुरते बाहेर असणाऱ्या नागरिकांनी या मसुदा यादीत आपले नाव काळजीपूर्वक तपासून घेण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
Edited By- Dhanashri Naik
