सचिन वाझे यांचा सुटकेच्या २४ तासांच्या आतच जामीन रद्द
मुंबई उच्च न्यायालयाने अंतिलिया बॉम्ब धमकी प्रकरणातील मुख्य आरोपी, माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या तुरुंगातून सुटकेला ७ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे.
अँटिलीया बॉम्ब हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मुंबई पोलिस दलातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यांच्या तुरुंग सुटकेला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली
न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने वाझे यांच्या सुटकेला अंतरिम स्थगिती दिली आहे ७ ऑक्टोबर रोजी, वाझे यांना जामीन मंजूर करणाऱ्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या एनआयएच्या याचिकेवर खंडपीठ सुनावणी घेणार आहे.
वाझे यांची सुटका रोखण्यासाठी एनआयए मंगळवार संध्याकाळपासून न्यायालयात धाव घेत होती. एजन्सीने सुरुवातीला विशेष एनआयए न्यायालयाकडे जामीन आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती, परंतु ही विनंती फेटाळण्यात आली. त्यानंतर एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
हे प्रकरण सर्वप्रथम न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती आर. आर. भोसले यांच्या खंडपीठासमोर आले. न्यायमूर्ती कोतवाल यांनी सुनावणीतून स्वतःला ...
न्यायमूर्ती कोतवाल यांनी सुनावणीतून स्वतःला दूर ठेवले. त्यानंतर एनआयएने न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठाकडे धावघेतली, परंतु हे खंडपीठही या प्रकरणाची सुनावणी घेऊ शकले नाही

