शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (21:57 IST)

सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे निधन

shardamai
जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद वामनराव पै व सुकन्या मालन कामत तसेच त्यांचे नातू निखिल पै, स्वप्निल कामत व नातसून प्रिया निखिल पै व पणतू यश पै असा परिवार आहे.
 
शारदा माईंच्या महानिर्वाणामुळे जीवनविद्या परिवारावर शोककळा पसरली आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या महानिर्वाणानंतर जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक कार्यक्रमात शारदामाई यांचा सक्रीय सहभाग व आशीर्वाद सदैव लाभत असे. जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक नामधारकाला त्यांचे मातृतुल्य प्रेम, मार्गदर्शन मिळत असे. त्यांच्या निर्वाणाने जीवनविद्या मिशनमध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor