गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (23:20 IST)

सदगुरु जग्गी वासुदेव यांनी मुंबईतील डब्बेवाल्यांची भेट घेतली

सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा 25,000 किलोमीटरहून अधिक मोटार सायकल प्रवासानंतर, काल मुंबई मध्ये बहुप्रतिक्षित भव्य माती वाचवा सार्वजनिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य उद्धव ठाकरे उपस्थित होते.  हा एक भव्य सार्वजनिक कार्यक्रम होता. संपूर्ण माती वाचवा धोरण हँडबुकमधील महत्त्वाच्या गोष्टींबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना सद्गुरू म्हणाले की, शेती एक व्यावहारिक कृती असून, या कृतीला एक व्यावसायिक आधार आहे. शेती आपल्या जगण्याचा आधारही आहे. शेत नाही तर शेतकरी बान्धव नाही .शेतीला व्यावहारिक संबोधित करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. तसंच या कार्यक्रमानंतर त्यांनी मुंबईतील डबेवाल्यांची भेट घेतली.