शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (19:31 IST)

लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळा संपन्न

गणेशभक्तांचं आराध्य दैवत 'लालबागचा राजा' चा पाद्यपूजन सोहळा संपन्न. मुंबईतल्या गणेशोत्सवांची सुरुवातच लालबागच्या राजाच्या पाद्य पूजनानं होते. त्यामुळे यंदा ढोलताशांच्या गजरात मोठया दिमाखात लालबागच्या राजाचा उत्सव साजरा केला जाणार आहे. 
 
 गेल्या वर्षी  कोविडच्या निर्बंधांमुळे निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा पाद्यपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर गेल्यावर्षी यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचने नुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं.