सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (19:49 IST)

पक्ष्याला वाचवताना गमावला जीव

sea link
वांद्रे-वरळी सी-लिंक ओलांडताना पक्ष्याला वाचवायला जाणे हे एका व्यावसायिकाच्या जीवावर बेतले होते. अमर जरीवाला आणि त्यांच्या चालकाला काळ्या-पिवळ्या टॅक्सीने धडक दिली. यात व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका जखमी पक्ष्याला वाचवण्यासाठी व्यावसायिक आणि त्याचा ड्रायव्हर सी लिंकवर थांबले होते. यावेळी भरधाव वेगानं येत असलेल्या एका टॅक्सीनं दोघांना चिरडलं. यात दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. दरम्यान, व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, टक्कर इतकी जोरदार होती की जरीवाला हवेत उडून रेलिंगवर आणि नंतर कारच्या वाटेवर पडले. दोघांनाही जवळच्या लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी जरीवाला यांना मृत घोषित केले. त्यांचा चालक शाम कामत (41) याच्यावर उपचार सुरू असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
 
अपघातानंतर पोलिसांनी टॅक्सी चालक रवींद्र कुमार जैस्वार (38) याला अटक केली असून, बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवल्याने मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा अपघात मालाडला जात असतेवेळी वांद्रे वरळी सी लिंकवर झाला होता.