कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' पुस्तकाला साहित्य अकादमी
साहित्य विश्वातील अतिशय मानाचा मानला जाणारा 'साहित्य अकादमी'चा पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठीमध्ये कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' या पुस्तकाला तर कोकणीमध्ये प्रकाश पर्यकर यांच्या 'वर्सल' या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
देशातील 24 भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांना हा सन्मान दिला जातो.साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा साहित्य अकादमीचे सचिव डॉ. श्रीनिवासराव यांनी हिंदी भाषेसोबतच त्यांनी इतर भाषांमधील विजेत्यांची नावेही जाहीर केली आहेत. या सर्वांना 12 मार्च 2024 रोजी नवी दिल्लीतील कमानी सभागृहात हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
रिंगाण या कृष्णात खोत यांच्या कादंबरीत विस्थापितांच्या जगण्याचे चित्रण आहे. कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. नवद्दोत्तरी काळातील मराठी साहित्याला वेगळी दिशा देणारे लेखक म्हणून प्रा. खोत यांची ओळख आहे. गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor