1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Sai Charani has collected more than Rs 32 crore in 71 days

साई चरणी तब्बल 32 कोटीहून अधिकचे दान ७१ दिवसात जमा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिर्डीतील साई मंदिर 16 नोव्हेंबरला खुलं करण्यात आलं. त्यानंतर 71 दिवसांत सुमारे 12 लाख 2 हजार 192 भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. या 71 दिवसांत साई चरणी तब्बल 32 कोटी 3 लाख 43 हजार 900 रुपयांचं दान प्राप्त झालं आहे. तशी माहिती साई मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे. असे मिळाले  दान रुपातील पैशाचं विवरण
रोख देणगी – 6 कोटी 18 लाख 70 हजार 361 रुपये
मनीऑर्डर – 50 लाख 71 हजार 979 रुपये
ॲानलाईन देणगी – 6 कोटी 39 लाख 1 हजार 896 रुपये
डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे – 2 कोटी 62 लाख 28 हजार 326 रुपये
चेक, डीडीद्वारे – 3 कोटी 5 लाख 89 हजार 626 रुपये
परकीय चलन – 22 लाख 60 हजार 165 रुपये
दक्षिणा पेटीत – 13 कोटी 4 लाख 20 हजार 547 रुपये
एकूण देणगी – 32 कोटी 3 लाख 42 हजार 900 रुपये
रोख आणि ऑनलाईन स्वरुपातील देगण्यांसह साई चरणी 796 ग्रॅम सोने आणि 12 किलो ग्रॅम चांदीचं दानही भाविकांनी केलं आहे.
पुढील लेख
नागपूरमध्ये पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेत