मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

संभाजी भिडेंच्या व्याख्यानाला परवानगी नाहीच

maharashtra news sambhaji vyakyannala
संभाजी भिडेंच्या मुंबईतील व्याख्यानाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. लालबागमध्ये रविवारी संभाजी भिडेंचं जाहीर व्याख्यान होणार होतं. मात्र, सुरक्षेच्या कारणावरुन पोलिसांनी या व्याख्यानाला परवानगी नाकारण्यात आली आहे. भीम आर्मी या सघटनेनं संभाजी भिडेंच्या या कार्यक्रमाला विरोध केला होता. 
 
दरम्यान ७ डिसेंबर रोजी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडेंना सशर्त जामीन मंजूर झालाय. नाशिकच्या जाहीर सभेत आंबा खाल्ल्यानं मुले होतात असा अजब दावा संभाजी भिडेंनी केला होता.