शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा

मुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली. इंडिगोच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या 6E 3612 या विमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेने तातडीने त्या दिशेने पावलं उचलली. सदर विमानाचे उड्डाण थांबवून विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र, तपसणीदरम्यान सुदैवाने कुठेही बॉम्ब सापडला नाही.

दरम्यान विमानात बॉम्ब ठेवल्याची बातमी देणाऱ्या प्रवाशाला सुरक्षकांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. या चौकशीदरम्यान सदर व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नसून त्याने बॉम्ब ठेवल्याची खोटी अफवा पसरवल्याची बाब उघडकीस आली. उपलब्ध माहितीनुसार, बॉम्बची अफवा पसरवणाऱ्या त्या प्रवाशााला एअरपोर्ट अॅथॉरिटीने ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, बॉम्ब नसल्याची खात्री करुन घेतल्यानंतर मगच इंडिगोचे 6E 3612 विमान दिल्लीकडे रवाना झाले.