हरहर महादेव चित्रपटाबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना भेटणार- संभाजीराजे
संभाजीराजे छ्त्रपती यांनी हरहर महादेव या सिनेमाबाबत पुन्हा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सिनेमाबाबत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून चर्चा करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं.
टाईम्स नाऊ मराठीने दिलेल्या वृत्तानुसार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “ शिवाजी महाराजांनी अफजलखानाला हिरण्यकश्यपूप्रमाणे मांडीवर घेऊन कोथळा बाहेर काढला असे दाखवण्यात आले. शिवाजी महाराज हे सगळ्यांचे दैवत आहेत, परंतु चित्रपटात शिवाजी महाराजांना नरसिंहाच्या अवताराप्रमाणे दाखवले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती होते त्यांनी असामान्य असे कार्य केले असे संभाजीराजे म्हणाले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक गोष्टी आहेत त्या दाखवता येतील पण असे चित्रीकरण दाखवणे चुकीचे आहे.
सेन्सॉर बोर्डाने अशा चित्रपटाला परवानगी दिलीच कशी? असा सवाल करत सेन्सॉर बोर्डाकडे आम्ही मागणी केली आहे की, एक ऐतिहासिक चित्रपटासंबंधित एक समिती नेमावी. यासंबंधित मी 16 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. महाराष्ट्रात जे चाललेले आहे ते अशोभनीय आहे.”