बुधवार, 12 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 (19:25 IST)

एकनाथ शिंदेंना गौरव पुरस्कार दिल्याबद्दल संजय राऊत संतापले

sanjay raut
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सम्मानित केले. त्यांना हा पुरस्कार शरद पवार यांनी दिल्लीत दिला. या पुरस्कारावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पवारांनी पुरस्कार दिल्याबद्दल शिवसेना युबीटीचे प्रवक्ते संजय राऊतांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.  
ते म्हणाले की, महाराष्ट्राचे राजकीय चित्र अतिशय विचित्र दिशेने जात आहे. कोण कोणाचा विश्वासघात करतो. कोण कोणाला पाठिंबा देतो. हे सर्व पाहायचे आहे. एकनाथ शिंदे ज्यांनी महाराष्ट्र सरकार पाडले आणि विश्वासघात केला अशा व्यक्तीला शरद पवार पुरस्कार देत आहे. हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा अपमान आहे.
आता आपण महाराष्ट्रातील लोकांसमोर कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात मित्र आणि शत्रू नसतात  पण अशा प्रकारे महाराष्ट्राविरुद्ध काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करणे हे राज्याच्या अस्मितेला हानिकारक आहे.
ही आमची भावना आहे, कदाचित शरद पवारांची भावना वेगळी असू शकते पण महाराष्ट्रातील लोकांना हे मान्य नाही.शिवसेना फोडणाऱ्यांचा सन्मान करणे हे दुःखद आहे दिल्लीतील वातावरण वेगळे असू शकते, पण राज्यात अशा गोष्टी सहन करू शकत नाही. राजकारणात काही गोष्टी अनावश्यक असतात. 
Edited By - Priya Dixit