गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (16:24 IST)

तेजस्वी पर्व सुरू होतंय अस म्हणत संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रीया

Sanjay Raut
'जे कल येतायेत ते पाहता, एक तरुण नेता केंद्रातल्या सत्तेला सुद्धा काटे की टक्कर देतोय. तेजस्वी पर्व सुरू होतंय असं चित्र आहे तसेच आता देशाने २०२४ साठी आत्मचिंतन करावे,' असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 
 
तेजस्वीच्या समोर पूर्ण मंत्रिमंडळ होतं. मात्र या मुलाने ज्याप्रकारे टक्कर दिली आहे. हे भविष्याकरता मोठं संकेत आहे, असं राऊत म्हणाले. आता महाराष्ट्रात परिवर्तन झालं तेव्हा संपूर्ण देशाला संदेश गेला. आपण परिवर्तन करू शकतो आणि याचा रिझल्ट आपण पाहतो आहे, असं देखील राऊत म्हणाले. 
 
बिहारचा निकाल काही लागू द्या, पण ज्या प्रकारे जनतेने साहस दखवलंय, त्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर होणार. 'जंगलराज आज से खतम होगा, मंगलराज आज से शुरू होगा'.  बिहार मध्ये लोकांना बदल हवा होता तो दिसतोय, असं म्हणत राऊतांनी टोला लगावला आहे.