''ते सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत?” संजय राऊत यांचा सवाल
”वीर सावरकरांबद्दलची भूमिका शिवसेनेने कधीही बदलेली नाही. जेव्हा जेव्हा त्यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्यं केलं गेलं. तेव्हा आम्ही सावरकरांच्या बाजूने उभे राहिलेलो आहोत. आमचे त्यांच्याशी नेहमीच भावनिक नाते राहिलेले आहे. आमच्यावर जे टीका करत आहेत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर जरूर द्यावं की, ते सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत?” असा प्रश्न शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाने केलेल्या टीकेला उत्तर विचारला आहे.
”शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाबाबत अनेकांना अनेक गोष्टी सांगितल्या. मात्र ते हे हेतुपुरस्सर विसरले की हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्यांच्या नावे असणाऱ्या सभागृहात दसरा मेळावा घेतला. मग याच वीर सावरकरांवर जेव्हा काँग्रेस नेते टीका करत होते, तेव्हा शिवसेना गप्प का होती? सत्तेच्या सिंहासनासाठी हे मौन शिवसेनेने धरलं आहे का?” असा प्रश्न भाजपा नेते राम कदम यांनी शिवसेनेला केला होता.