शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 ऑक्टोबर 2020 (16:27 IST)

भाजपाने सत्ताधारी पक्षांना 'हा' प्रश्न विचारला आहे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सरकारी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या १६ मंत्र्यांपैकी एकाही मंत्र्याने ही हिंमत का दाखवली नाही असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. देवेंद्र फडवीस यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर ते सरकारी रुग्णालयात दाखल होतील. त्यांची कोरोना चाचणी दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले. आता यावरुन भाजपाने सत्ताधारी पक्षांना प्रश्न विचारला आहे.
 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की, मला जर कोरोना झाला तर मुंबईच्या सरकारी रुग्णालयातच दाखल करा. सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करा असं फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना सांगितलं होतं. या दोघांच्या संवादाची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती.