मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (08:20 IST)

संजय राऊतांचे थेट किरीट सोमय्यांना पत्र, म्हणाले – ‘पिंपरी चिंचवडमधील ‘त्या’ कंपनीचा 500 कोटींचा घोटाळा उघड करा’

भाजपचे  माजी खासदार किरीट सोमय्या  यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणत आहेत. आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी थेट किरीट सोमय्या यांनाच पत्र लिहिले आहे. या पत्रातून संजय राऊत यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या  नावाखाली 500 कोटींचा गैरव्यवहार  झाल्याचा दावा संजय राऊत   यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करुन दोन पत्रच सोमय्यांना लिहिली आहेत. याप्रकरणी ईडी  आणि सीबीआयकडून  चौकशी करावी अशी मगणीच संजय राऊत यांनी सोमय्या यांच्याकडे केली आहे.
 
संजय राऊत यांनी सोमय्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुम्ही दररोज वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर आरोप करत असतात. त्यामुळे एका महत्त्वाच्या प्रकरणाचा तुमच्याकडे पाठपुरावा करत आहे. काही दिवसांपूर्वीच मी पिंपरी चिंचवडचा दौरा केला होता. त्यावेळी काही महत्त्वाची आणि गंभीर कागदपत्र हाती लागली. त्यानुसार 2018-19 मध्ये स्मार्ट सिटी योजनेसाठी क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस लि.  या कंपनीला 500 कोटींचे कंत्राट देण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला आहे.