1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Sanjay Raut Sanjay Raut's judicial custody increased again

Sanjay Raut :संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

पत्राचाळ गैर व्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडी ने 31 जुलै रोजी अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आज न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.  31जुलै 
रोजी ईडीने संजय राऊतांना अटक केल्यानंतर तुरुंगात ठेवले होते नंतर त्यांना सुरुवातीला 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. नंतर त्यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडीत  नंतर पुन्हा त्यांच्या कोठडीत वाढ करून त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. आता 14 दिवसांची मुदत संपल्यावर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्या कोठडीत 19 सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. 
पुढील लेख
‘भारत जोडो’यात्रेचे महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला आगमन होणार