नीलम गोऱ्हे म्हणतात, हा तर कामाचा आणि सेवेचा वारसा आहे
तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होत आहेत. यावर नीलम गोऱ्हे म्हणल्या की,तुम्ही तेजसचे समर्थक आहात का ? आदित्य आणि तेजस अनेक कार्यक्रमात सहभागी होतात. दोघे पण भाषण देखील करतात. शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांनी तलवार देऊन आशिर्वाद दिले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आणि स्वतःला वाटेल तेव्हा ते राजकारणात सक्रीय होतील. पण मला एकच वाटत की,त्यांच्या कुटुंबापैकी कोणी ही आल तरी ही घराणेशाही नाही.
कामाचा आणि सेवेचा वारसा आहे.त्यामधून लोकांना आधार मिळत असेल तर त्यात काही चुकीचे नाही. १८ ते २१ वयोगटातील जो तरुण राजकारणा बदल उदासीन आणि नैराश्यात होता. तो तरुण वर्ग आदित्य ठाकरे आल्यावर अधिक सक्रीय झाला. पण सध्या तेजस यांच शिक्षण सुरू आहे. राजकारणात सक्रिय होण्याबाबत सर्व कुटुंबिय मिळून निर्णय घेतील असे सांगितले.