सप्तश्रृंगी देवी मंदिराचे होणार नूतनीकरण
नाशिक : साडेतीन शक्तीपीठातील एक असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवी मंदिराचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचा सुतोवाच सप्तशृंगी देवस्थान मंदिर ट्रस्टच्या वतीने ॲड. ललित निकम यांनी केले. सुयश हॉस्पिटल व सप्तशृंगी देवस्थान मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद घेणार आली. त्यावेळी सदरची माहिती देण्यात आली.
यावेळी मंदिर विकासाची माहिती देताना 22 चौरस फुटामध्ये मंदिराची पुनर्निर्मिती केली जाणार असून मागील 30 ते 40 वर्षांनंतर कामाला प्रारंभ केला जाणार आहे कायदेशीर सोपासकार परवानगी सर्व पूर्ण झाले असून येत्या महिन्याभरात मंदिर उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे यात प्रामुख्याने मंदिराच्या गाभाऱ्याला चांदीचे आवरण लावले जाणार असून
येत्या पाच ते सहा महिन्यात गाभाऱ्याचं सुशोभीकरण केले जाईल या सोबतच देवीच्या मूर्तीवरून काढण्यात आलेल्या शेंदुराचा स्तंभ उभारला जाणारा असून तो मंदिराच्या पहिल्या पायरी जवळ उभारण्यात येणार आहे रोपवे समोर प्रशासकीय कार्यालय तसेच इतर समन्वय कार्यालय उभारले जाणार आहेत तलावाच्या सुशोभीकरणासाठी जन संग्रहातून खर्च केला जाणार आहे भाविकांच्या सहयोगातून सुशोभीकरण केले जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Edited by : Ratnadeep Ranshoor