1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 एप्रिल 2020 (18:06 IST)

औरंगाबादमध्ये 'सारी' आजाराचे थैमान

sari infection
औरंगाबाद शहरात सारी या आजाराने थैमान घातलं आहे. आतापर्यंत जवळपास 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अजूनही शंभरपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या आजारामुळे फक्त औरंगाबादच नाही, तर संपूर्ण राज्यासमोर एक नवं संकट उभं ठाकलं आहे. या आजाराचे रुग्ण औरंगाबाद, जालना, नाशिक सोलापूर आणि मुंबईतही आढळू लागले आहेत. 
 
सारी हा आजार फ्लू वर्गातील असून सर्दी, खोकला, ताप अशक्तपणा ही आजाराची लक्षणे आहेत. प्रथमदर्शनी हा आजार कोरोना सदृश्य असला, तरी या आजारातील रुग्णांची ‘कोविड-19’ टेस्ट निगेटिव्ह येते. मात्र, याची लक्षणे तीव्र असल्यामुळे या आजारात रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.
 
‘सिव्हेअर अॅक्यूट रेस्परेटरी इन्फेक्शन’  असं सारीचं पूर्ण नाव. या आजारात सुरुवातीला सर्दी-खोकला त्यानंतर ताप आणि नंतर कमालीचा अशक्तपणा येतो. त्यानंतर इन्फेक्शन आटोक्यात नाही आलं, तर रुग्णाचा मृत्यू होतो. सध्या शंभर रुग्णांमागे 13 जणांचा मृत्यू होत झाल्याने, प्रथमदर्शनी या आजाराच्या मृत्यूचे प्रमाण 13 टक्के आहे, अस समजावं लागेल. हे प्रमाण खूप  गंभीर स्वरुपाचे आहे.