1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (21:17 IST)

लसीकरणात निरुत्साह दाखवणं सरपंचांना चांगलंच भोवलं, 55 सरपंचांना नोटीस

Sarpanch is well aware of discouragement in vaccination
महाराष्ट्रातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री झाल्याने लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. दुसरीकडे सोलापुरातील 55 सरपंचांना नोटीस बजावण्यात आली आहे. सरपंचांना ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 अनुसार कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. लसीकरणात निरुत्साह दाखवणं सरपंचांना चांगलंच भोवलं आहे. 
कोरोना विरुद्ध लसीकरण मोहिमेत निरुत्साह दाखवणाऱ्या सरपंचांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली. 3 दिवसांत उत्तर द्या नाहीतर सरपंच पद रद्द करण्यात येईल असा इशारा या नोटीसमधून देण्यात आला आहे. 
या निरुत्साही सरपंचांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोरोना लसीकरणासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे आता 55 सरपंचांना आता नोटीसला उत्तर देणं बंधनकारक आहे. नाहीतर त्यांचं पद जाण्याची शक्यता आहे.