गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (19:22 IST)

Satara : वीर पत्नीला 21 वर्षांनी मिळालं सौभाग्य, मुलीच्या सासरच्या मंडळींनी सौभाग्याचं लेणं दिलं

haldi kunku
आपल्या देशात पतीच्या मृत्यू नंतर पत्नीला वेगळ्या दृष्टी ने बघतात. समाजात देखील तिला कोणताच प्रकारचा मान दिला जात नाही.शुभ कार्यात देखील तिला सहभागी करत नाही.  कमी वयात पतीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या पश्चात पत्नीला आयुष्य काढणं कठीण होऊन जात. मात्र आता विधवा महिलेला मान देण्याची प्रथा काही गावात सुरु झाली आहे. काही सामाजिक संस्था विधवा महिलेचे पुनर्विवाह करण्याचं उपक्रम राबवत आहे. 

सातारा जिल्ह्यात सैन्य दलात कार्यरत असलेल्या पतीचं निधन 21 वर्षांपूर्वी झालं. खूपच कमी वयात महिलेला वैधव्य आलं. तेव्हा पासून तिला कोणताच मान मिळाला नाही. शुभ कार्यात तर नाहीच. अशा प्रकारे जीवन जगताना तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्या आयुष्यात सुख आणायचं ठरवलं. मग काय तिच्या सासरच्या मंडळींनी तिचे पुन्हा दुसरं लग्न लावून दिल आहे. तिने पुन्हा हातात हिरवा चुडा भरला असून कपाळी सौभाग्याचं कुंकू लावलं आहे. 

साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात रुई गावातील सुनील सावंत हे सैन्यात असून त्यात 21 वर्षांपूर्वी शहीद झाले. त्यांच्या निधनांनंतर त्यांच्या पत्नी नीता सावंत हिने सासर सोडून माहेरी आली आणि तिने आपल्या एकुलत्याएक मुलीचा सांभाळ केला. तिला चांगले शिक्षण दिले आणि तिचे कोडव्यातील ननावरे कुटुंबात लग्न लावून दिले. 
जिथे आपल्या देशात विधवेला कोणतेही शुभ कार्यात मान दिला जात नाही तिथे मुलीच्या सासरच्या लोकांची लग्न आईच लावणार आणि लग्नाच्या सर्व विधी मुलगी शिवानीची आई नीता सावंत याच करणार अशी अट घातली.

लग्नाचा पहिला विधी घाणा भरणे हा देखील नीता सावंत यांच्याकडून करण्यात आला. मुलीच्या सासरच्या मंडळींनी नीताला हळदी कुंकू लावलं आणि हिरवा चुडा देखील भरला. तिला सौभाग्याचा मान देण्यात आला.  
वीरपत्नी नीताला सौभाग्याचं लेणं मिळवून देण्यासाठी जय हिंद फाउंडेशन यांनी मुलीच्या सासरच्या मंडळी ननावरे कुटुंबाचे कौतुक केले आहे. 
 
Edited by - Priya Dixit