बुधवार, 4 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 जानेवारी 2023 (08:18 IST)

सातपूर : कुटुंबातील तिन्ही पुरुषांची आत्महत्या; वडिलांसह दोन्ही तरुण मुलांचा समावेश

suicide
नाशिक (प्रतिनिधी) – शहरातील औद्योगिक परिसर असलेल्या रहिवासी भाग सातपूर परिसरातील राधाकृष्णनगर येथे व्यावसायिक कुटुंबातील तिन्ही पुरुषांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. वडिलांसह दोन्ही तरुण मुलांनी घरातील तीन खोलींमध्ये वेगवेगळा गळफास घेऊन जीवन संपविले. पुरुषांच्या या दुर्दैवी निर्णयामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक शिरोडे (वडील, वय ५५), प्रसाद शिरोडे (मोठा मुलगा, वय २५), राकेश शिरोडे (वय २३) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या तिघांनी एकाच घरात तीन वेगवेगवेगळ्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिरोडे कुटुंबिय हे अशोकनगर शेवटचा बसस्टॉप परिसरात फळांचा व्यवसाय करीत होते.
 
शिरोडे कुटुंबीय हे मूळचे देवळा तालुक्यातील उमराणे येथील रहिवासी आहेत. गेल्या १० वर्षांपूर्वी ते नाशिकमध्ये व्यवसायानिमित्त आले. राधाकृष्ण नगर परिसरात त्यांचे घर आहे. वडिल दीपक हे अशोक नगर शेवटचा बसस्टॉप येथील भाजी बाजाराजवळ फळ विक्री करत होते. तर त्यांची मुले प्रसाद आणि राकेश हे चारचाकी वाहनांवर फळविक्रीचा व्यवसाय शिवाजी नगर परिसरात करायचे.
 
आर्थिक स्थिती हलखीची असल्याने शिरोडे कुटुंबिय कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे ते नैराश्यात होते. आज दुपारच्या सुमारास दीपक शिरोडे यांच्या पत्नी काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. ही संधी साधून वडिलांसह दोन्ही मुलांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घरातील तिन्ही खोलींमध्ये असलेल्या पंख्याला गळफास घेत आपले जीवन संपविले. थोड्या वेळाने आई घरी येताच तिने दरवाजा ठोठावला. पण, आतून कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्या घाबरल्या. परिसरातील नागरिकांना त्यांनी आवाहन केले. त्यानंतर दरवाजाची कडी तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर दरवाजा तोडून आत प्रवेश करताच या मातेला आपल्या पत्नीसह दोन्ही तरुण मुलांनी गळफास घेतल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे या मातेने जोरदार हंबरडा फोडला.
 
कन्येचा जन्म आणि पित्याची आत्महत्या
प्रसाद शिरोडे यांच्या पत्नी या गर्भवती असल्याने मुंबईत माहेरी गेल्या होत्या. आज सकाळीच त्यांची प्रसुती झाली. आणि त्यांनी कन्येला जन्म दिला. शिरोडे कुटुंबात लक्ष्मीने आगमन केल्याची वार्ता सगळीकडे पसरली. मात्र, अशा आनंदाच्या प्रसंगीच शिरोडे कुटुंबाने अतिशय कठोर निर्णय घेतला. कन्येचा जन्म झालेला असताना पित्यासह आजोबा आणि काका यांनी आत्महत्या केल्याने सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor