मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (22:01 IST)

सावंत यांनी ट्वीट करत भाजपवर केली जोरदार टीका

Arvind Sawant
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यावरुनही शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येतेय. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत  यांनी ट्वीट करत भाजपवर जोरदार टीका केलीय. भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या तरी शिवसेना कधीच संपणार नाही, असं सावंत म्हणाले.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने सांगत आहेत की भाजपला शिवसेना संपवायची आहे. हेच आज जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं. महामहिम राज्यपालांच्या कालच्या वक्तव्यामागे भाजपला आहे हे देखील समोर आलंय. जे गद्दार शिवसेना आमची असं म्हणतात त्यांचे काय होणार, हे ही आता महाराष्ट्राच्या लक्षात आलं. त्यांना आता भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, असा दावाही अरविंद सावंत यांनी केलाय.