शनिवार, 21 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (14:38 IST)

ज्येष्ठ काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचं निधन

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि विधान परिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून एक अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
 
शरद रणपिसे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. नंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. मागील पाच दिवसापासून व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते मात्र आज दुपारी 12 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
1951 साली पुण्यात जन्मलेले शरद रणपिसे यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात रस होता. पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. महानगरपालिकेपासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास विधान परिषद आमदार ते विधिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असा राहिला.