शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 डिसेंबर 2021 (16:15 IST)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्या प्रकरणी सात जणांना अटक

16 डिंसेबरच्या मध्यरात्री काही समाजकंटकांनी बंगळुरू इथं सदाशिवनगर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर काळा रंग ओतला.
 ही बातमी सोशल मिडीयावर पसरल्याने संतप्त भावना व्यक्त होउ लागल्या. छत्रपतीं शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवरोधात कारवाईच्या मागणीहोऊ लागल्या .ठिकठिकाणी या घटनेचे पडसाद दिसू लागले. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. 
सदाशिव नगर पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून शनिवारी पाच जणांना अटक करण्यात आली .तर आज सकाळी दोघांना अटक केली असून हे विकृत समाज कंटक कर्नाटकातील रणधीर सेनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.