बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जानेवारी 2019 (09:22 IST)

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सात कल्याणकारी योजना

आता सरकारने देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी 122 प्रकारची विविध कामे करणार्‍यांसाठी सात कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनांमुळे राज्यातील सुमारे साडेतीन कोटी मजुरांना फायदा होणार आहेत.
 
केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्य  सरकार आता शेतमजूर, घरेलू कामगार, कचरा वेचक, वर्तमानपत्रे आणि दूध वाटणारे, अगरबत्ती आणि चपलांच्या व्यवसायातील कामगार, रंगकाम करणारे, यंत्रमाग कामगार, दुकाने आणि गोदाम हमाल, रिक्षाचालक, सुतार कामगारांचा असंघटित कामगारांमध्ये समावेश करणार आहे. या निर्णयामुळे मजुरांना विविध प्रकारचे सरकारी लाभ मिळणार आहेत. कामगार विभागाचे विकास आयुक्त पंकज कुमार म्हणाले, केंद्र सरकारच्या या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचा पथदर्शी प्रकल्प लवकरच राबवला जाणार आहे.