सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जानेवारी 2019 (09:18 IST)

आता नोकऱ्याही द्या, उद्धव ठाकरे यांचा सल्ला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. बेरोजगारी आणि गरिबी या दोन्ही आघाड्यांवर राज्यकर्ते अपयशी ठरतात तेव्हा आरक्षणाचा डाव टाकावा लागतो. उत्तर प्रदेशातील सवर्ण मते मिळावीत म्हणून भाजपाने हा खेळ केला असेतर तो त्यांना अंगलट येईल. सवर्णांसाठी तुम्ही १० टक्के जागा राखून ठेवल्या. पण नोकऱ्यांचे काय, त्या कधी देता, असा सवाल करत सवर्णांना आरक्षण दिले, आता नोकऱ्याही द्या, असा सल्ला त्यांनी दिला.
 
उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून सवर्णांना आरक्षण देण्यावर आपले मत मांडले. आर्थिक निकषावर सर्वच जातीधर्मातील गरिबांना आरक्षण मिळायला हवे. पोटाला जात नसते. पोटाला जात चिकटवू नका, असे मत शिवसेनाप्रमुखांनी मांडले होते, याची आठवण ठाकरे यांनी करून दिली.