बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 7 जानेवारी 2019 (08:36 IST)

राज यांचे उद्धव ठाकरे यांना अमितच्या लग्नाचे आमंत्रण

मनसेप्रमुख राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवास्थानी मातोश्रीवर येथे पोहोचले आहेत. राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे 27 जानेवारीला विवाहबद्ध होत आहेत. या विवाहाचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले असून, पुढील दिवसांमध्ये राज ठाकरे लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी अनेक दिग्गजांच्या भेटीगाठी घेणार आहेत. राज ठाकरेंनी त्यांच्या अनेक व्यंगचित्रांमधून शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव यांच्या भेटीसाठी पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहेत. अमित ठाकरे 27 जानेवारीला मिताली बोरुडेसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. याच सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी राज मातोश्रीवर पोहोचले आहेत. मागील दोन वर्षांपासून राज ठाकरे मातोश्रीवर गेले नव्हते. याआधी 29 जुलै 2016 रोजी राज ठाकरेंनी मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेतली होती. 27 जुलै रोजी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस झाल्यानंतर राज यांनी त्यांची भेट घेतली होती. त्याआधी 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आल्यानंतर राज यांनी उद्धव यांचं अभिनंदन केलं होतं. त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झाले असून तर्क वितर्क लावले जात आहेत.