सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जानेवारी 2019 (08:58 IST)

आदित्य उद्धव ठाकरे जाणार की नाही आमित राज ठाकरे यांच्या लग्नाला

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे 27 जानेवारीला विवाहबंधनात अडकणार असून, लग्नाचं निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देण्यासाठी शनिवारी राज ठाकरे  स्वतः मातोश्रीवर गेले होते. आता उद्धव यांचे सुपुत्र युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंना या लग्नाला जाणार का, असा प्रश्नविचारण्यात आला. त्यावर लग्नाला जाणार, जावंच लागणार. त्यात राजकारण नाही, असं उत्तर आदित्य यांनी दिल आहे. आदित्य आणि अमित ठाकरे हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. तर राजकारणामुळे राज आणि उद्धव यांच्यातील फारसे चांगले नाही. मात्र या दोघांनी कौटुंबिक संबंध जपल्याचं अनेकदा दिसून येते. त्यामुळे अमित ठाकरेंच्या लग्नाला जाणार का, असा प्रश्न विचारताच क्षणाचाही विलंब न लावता आदित्य यांनी होकारार्थी उत्तर दिल आहे. फॅशन डिझायनर असलेल्या मिताली बोरुडेसोबत अमित ठाकरे 27 जानेवारीला  विवाहबंधनात अडकणार आहेत. याच लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज शनिवारी मातोश्रीवर गेले होते. यानंतर राज आणि उद्धव यांचे मातोश्रीबाहेरचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.
(Photo- ANI)