गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जुलै 2019 (10:28 IST)

सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांनी छाप्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, दोन अधिकारी जखमी

Sex racket attackers attack police
नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल परिसरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांनी छाप्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला केला. यात डोक्यास दगड लागून दोन पोलिसांना दुखापत झाली आहे. पाच महिला सुटका केली व दलालांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.सिद्धार्थ घुसळे, अक्षय वडते ही जखमी पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अन्सार गफुर शेख, वाजिद नसीर शेख, मन्सूर रहमानभाई पठाण, बाबा निजाम शेख, गंगाराम जानकू काळे, रशिद सरदार शेख ही अटक केलेल्यांची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, पांढरीपुलावरील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना 5 महिलांसह 3 ग्राहक व तीन चालक आढळून आले.
 
पोलिस सर्वांची विचारपूस करीत असताना गंगाराम काळे व रशिद सरदार शेख याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असताना गंगाराम काळे व रशिद सरदार यांने पोलिसांवर हल्ला केला. काळे याने दगड फेकून मारला. तो दगड पोलिस कर्मचारी सिद्धार्थ घुसळे यांना लागला. तसेच रशीद याने पोलिस कर्मचारी अक्षय वडते यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.