शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जुलै 2019 (16:48 IST)

काहीजण भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत : राधाकृष्ण विखे पाटील

“काँग्रेस- राष्ट्रवादीचे अनेकजण संपर्कात आहेत. काहीजण भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत”, असा दावा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. विखे पाटील म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर अनेक जण नाराज आहेत. म्हणूनच मी स्वतः भाजपमध्ये आलो. येत्या काळात भाजप प्रवेशासाठी अनेकजण उत्सुक आहेत. काही जण संपर्कात आहेत. मात्र पक्ष अंतिम निर्णय घेईल. आणखी कुणी प्रवेश केला तर नवल नाही. मेळ घालावा लागेल. ”.
 
सकारात्मक भूमिका घेऊन, विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात वेगवेगळ्या आघाड्यांवर सरकारने विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्याचा फायदा भाजपला होईल, असं विखे पाटील यांनी नमूद केलं.
 
काँग्रेसमुक्त महाराष्ट्र माझ्यासाठी मुद्दा नाही. प्रत्येक पक्षाला भूमिका असते, धोरणं असतात. राजकीय पक्षाबाबत मी काही भाष्य करणार नाही. सध्याचं सरकार अनेक रखडलेली कामं करत आहे. आरक्षणाचा मुद्दा असो वा अन्य मुद्दे मुख्यमंत्र्यांनी निकाली लावला. सरकार सकारात्मक भूमिका घेतं, त्यामुळे सर्वांना सरकारबद्दल आकर्षण आहे, असं विखे म्हणाले.