शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (17:21 IST)

नाशिकात धर्मांतराचे आमिष दाखवत महिलेवर लैंगिक अत्याचार, चौघांनां अटक

rape
नाशिकच्या सिन्नर शहरात महिलेला धर्मांतराचे आमिष दाखवत तिला घरात महिनाभर डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनीचौघांना अटक केली आहे. 

सदर महिला रोजगारासाठी मालेगाव एमआयडीसी परिसरात राहत होती.आरोपींच्या ओळखीच्या दोन महिलांनी पीडितेला रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली एका घरात नेले आणि महिनाभर तिला कोंडून  ठेवले आणि तिच्यावर दोन पुरुषांनी अत्याचार केला. तसेच तिचे धर्मांतर करून  देण्याच्या आमिष दाखवत एका फादरने  तिला गुंगीचे औषध देऊन फादरसह दोन पुरुषांनी तिच्यावर महिनाभर तिच्यावर अत्याचार केला. घटना 30 नोव्हेंबर 2022 ते 29 डिसेंबर 2022 या दरम्यान घडली .तसेच तिच्या मुलांवर भीक मागण्याची पाळी आली आहे. पीडित महिलेने या घटनेची तक्रार सिन्नर पोलीस ठाण्यात 4 फेब्रुवारी रोजी केली. या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात  गुन्हा दाखल केला असून एक  जण  फरार  असून  चौघांना अटक केली आहे. आरोपीना न्यायालयात  हजर  करण्यात आले असून न्यायालयाने आरोपींना  तीन  दिवसांची  पोलीस कोठडी  सुनावली आहे. 
 
Edited By - Priya Dixit   .