मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मी स्वतः २७ तारखेला ईडीच्या कार्यालयात जाणार: शरद पवार

शरद पवार यांना ईडी नोटिसीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलने केली आहेत. आता स्वतः शरद पवार पुढे आले आहेत, मुंबई: मी गुन्हा काय केले आहे, हे तरी मला समजू द्या असे म्हणत इ्रडीचा पाहूणचार स्वीकारण्यासाठी मीच शुक्रवारी (दि. २७) दुपारी इडी कार्यालयात जाणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे या प्रश्‍नावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.ईडीने माझ्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी म्हणजेच शिखर बॅंक प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका घेणार आहे. मात्र, मी नक्की गुन्हा काय केला ते तरी मला समजलं पाहिजे असेही पवार म्हणाले. पुढील महिनाभर मी निवडणूक प्रचारात व्यस्त असेन. मी मुंबईबाहेर राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी दोन वाजता ईडीच्याकार्यालयात मी स्वतःहूनच जाणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना माझ्याबाबत जी माहिती हवी असेल ती देईन. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे असेही त्यांनी सांगितले.
 
मी राज्य सहकारी बॅंकेचा कधीही संचालक वा सदस्य कधीच नव्हतो. मी महिनाभर राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार आहे, त्यामुळे ईडीला माझी गरज लागली तर नी एकदम अदृष्य झालो असे वाटू नये म्हणून मीच ईडीच्या मुंबईतील कार्यालयात दाखल होणार असल्याचे पवारांनी सांगितले.‘दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही, आमच्यावर शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत. मी संविधान मानणारा आहे,’ असं शरद पवार म्हणाले. आता संपूर्ण महिना निवडणूक प्रचारासाठी वेळ देणार आहे, त्यामुळे मी मुंबईबाहेर राहणार आहे. ईडीला मला काही प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल आणि मी उपलब्ध नाही, असं व्हायला नको, म्हणून मी ईडीच्या ऑफिसमध्ये जाणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.‘माझ्या आयुष्यातील गुन्हा दाखल व्हायचा हा दुसरा प्रसंग आहे. याआधी १९८० साली शेतकरी प्रश्नावर दिंडी काढली होती तेव्हा जळगावमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता,’ ही आठवण पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितली.