सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भीमा कोरेगाव प्रकरणामुळे सरकारवर नाराज: शरद पवार

जेष्ठ नेते शरद पवार हे सरकारवर नाराज झाले आहेत. भीमा कोरेगाव येथे ५० वर्षात एकही अनुचित घटना घडली नाही ती आताच का घडली ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यांनी आज संसदेत भाषण केले त्यात त्यांनी नेक मुद्दे मांडले आहेत. शरद पवार म्हणतात की - भीमा कोरेगांव प्रकरणी राज्यसभेतील चर्चेत काही मुद्दे पुढे आणणे आवश्यक होते. गेल्या २०० वर्षांपासून दलित समाजातील अनुयायी श्रद्धेने भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. माझ्या माहितीप्रमाणे, गेल्या ५० वर्षांत या ठिकाणी कोणतीही अघटित घटनाही घडलेली नव्हती.
 
या रस्त्यात वढू गाव आहे. या गावात संभाजी राजांची मुघलांनी हत्या केली होती. तेथे त्यांची समाधी आहे. या समाधीची रक्षा करण्यात दलित समाजाचे मोठे योगदान आहे आणि त्यामुळे दलित समाजातील व्यक्तीचीही समाधी तेथे बांधण्यात आली होती. पण दुर्दैवाने महिन्यापूर्वी काही समाजकंटकांनी ती समाधी तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांची चौकशी सुरू असल्याने मी त्यांचे नाव घेणार नाही. पण त्या दलित व्यक्तीची समाधी तोडण्याच्या प्रयत्नाची प्रतिक्रिया १ जानेवारीला या अनुयायांवर उमटली.
 
मोठ्या प्रमाणावर अनुयायी येणार असूनही सरकारने सुरक्षेची खबरदारी घेतली नाही, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. जे झाले त्यातून लवकरात लवकर बाहेर पडून शांततापूर्ण मार्गाने दोन्ही समाजातील तेढ कमी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.