1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जून 2023 (20:29 IST)

त्याग केल्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झाले, प्रवीण दरेकर यांची तीव्र नाराजी

pravin darekar
‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली एक जाहिरात अनेक वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीवरूनच भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवीण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिंदे लोकप्रिय असोत किंवा फडणवीस लोकप्रिय असोत. दोघांना मिळून महाराष्ट्रात काम करायचं आहे. दोन्ही पक्ष आणि नेते यांचा एकत्रित विचार होणे गरजेचे आहे. एकमेकांना कमी दाखवण्यासाठी कोणी खतपाणी घालत असेल, तर त्याला बळी पडू नका. यामुळे वातावरण दुषित होईल.
 
मुळात दोन्ही पक्ष एकत्र आले म्हणून सत्ता आली. एका हाताने टाळी वाजत नसते. तसेच ताकद ही आपापसात आजमावण्यापेक्षा विरोधकांनी आपल्या ताकदीचा धसका घेतला पाहिजे. केवळ ४० आमदारांच्या जीवावर सत्ता आली नसती. भाजपचे तुमच्याहून तिप्पट आमदार आहेत. आमचे आमदार जास्त असूनही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राहिले. भाजपने त्याग केला म्हणून शिंदे मुख्यमंत्री झाले, त्याचं तुम्ही काही मूल्यमापन करणार आहात की नाही?, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

Edited By- Ratnadeep Ranshoor