रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (08:04 IST)

शिंदे गट-मनसे कार्यकर्त्यांत जुंपली

sarthak shinde
कल्याण-डोंबिवली शिंदे गटाचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या लोकसभा मतदारसंघात ते दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले. परंतु या मतदारसंघात जशी भाजपची नजर होती, तशी मनसेचीही आहे. कारण येथे मनसे आमदार राजू पाटील यांचाही चांगलाच प्रभाव आहे. येथे आता भाजपने एक पाऊल मागे घेतल्यानंतर मनसे नेते आक्रमक झाले असून, आता खा. श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यकर्त्यांत व्हीडीओ वॉर रंगला आहे.
 
खा. श्रीकांत शिंदे यांच्या जागेवर प्रथम भाजपने दावा केला होता. मात्र, आता भाजपने या जागेऐवजी ठाणे लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केल्याचे समजते. येथून भाजपने माघार घेतल्यानंतर मनसे सक्रीय झाली आहे. त्यामुळे आता शिवसेना (शिंदे गट) आणि मनसेमध्ये शाब्दिक वॉर रंगले आहे. खा. श्रीकांत शिंदे यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यावर नुकतीच टीका केली होती. त्यावरून सोशल मीडियावर हा वाद रंगला आहे. शिवसेनेने आ. राजू पाटील यांचा डोंबिवलीचा पाकीटमार असा उल्लेख केला, त्याला मनसेने प्रत्युत्तर देत आपका क्या होंगा माजदार अशा आशयाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरून हा वाद रंगला.