रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 31 डिसेंबर 2023 (15:49 IST)

Shirdi: नववर्षानिमित्त शिर्डीच्या साईबाबा मंदिरात अलोट गर्दी

Saibaba
Shirdi:उद्या पासून नवीन वर्ष सुरु होत आहे. नववर्षच्या प्रित्यर्थ शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात साईबाबांचे दर्शन घेऊन करण्याच्या हेतूने भाविक आले आहे. नवीन दर्शन कॉम्प्लेक्स मुळे  साई भक्तांचे दर्शन अधिक सोपे झाले आहे. सकाळ पासून साईंच्या भाविकांनी साईबाबाच्या चरणी हजेरी लावली आहे. 

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. मंदिराला फुलांची आरास केली आहे. फुलांनी ओम साईराम असे लिहिले आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नागरिक आणि भाविक सज्ज आहे. शिर्डीत साईबाबा संस्थान कडून 110 कोटी रुपये खर्च करून नवीन दर्शन कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे. या मुळे भाविकांना दर्शन सहज करता येत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit