मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (16:24 IST)

कुणीही मोर्चे, आंदोलने करू नये, इंदुरीकर महाराजांचे आवाहन

किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराजांच्या समर्थनार्थ अनेक लोकं पुढे आले आहेत. त्यांच्यासाठी आंदोलन करण्याची चाहत्यांनी तयारी सुरू केली असता महाराजांकडून आवाहन करण्यात आले आहे. 'आपल्यासाठी कुणीही मोर्चे… आंदोलनं करू नये' असं आवाहन इंदुरीकरांनी पत्रकाद्वारे केलं आहे. या पार्श्वभुमीवर इंदुरीकर महाराजांनी आपल्या समर्थकांना पत्रामार्फत संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. न्यायाच्या मार्गाने जाणार असल्याचे त्यांनी या पत्रातून स्पष्ट केले आहे. 
 
दुसरीकर महाराजांचं विधान चुकीचं असून त्याच समर्थन करत नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. इंदुरीकर समाज प्रबोधनाच काम करतात. मी त्यांच्या अनेक किर्तनाला गेलोय. ते अनेक सामाजिक विषय हाताळतात. त्यांच महिलांविषयीचं विधान चुकीचं आहे. त्याच समर्थन होऊ शकत नाही. पण एका विधानानं माणूस चुकीचा होत नाही. इंदुरीकर महाराजांच्या विधानाचे समर्थन करत नसल्याचे ते म्हणाले.