बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (10:00 IST)

महाराज इंदुरीकरांना अखेर कायदेशीर नोटीस

गर्भलिंग निदानासंदर्भात किर्तनात केलेल्या वक्तव्याने अडचणीत सापडलेल्या निवृत्ती महाराज इंदुरीकरांना अखेर आरोग्य विभागाने कायदेशीर नोटीस बजावली आहे. गुरुवारी इंदुरीकरांना संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावली असून यासंदर्भात इंदुरीकर यांचा खुलासा मागविण्यात आल्याची माहिती मिळाली.
 
जिल्हा रुग्णालयातील पीसीपीएनडीच्या सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये महानगरमधील वृत्तासंदर्भात चर्चा होऊन हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनीदेखील याची गंभीर दखल घेत निवृत्ती महाराजांना नोटीस बजावणार असल्याचे सांगितले होते. गुरुवारी मुरंबीकर यांच्या आदेशावरुन संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ही नोटीस महाराजांना बजावली. पंधरा दिवसात महाराजांचा खुलासा आल्यानंतर पुढील निर्णयासाठी ही बाब वरिष्ठांकडे पाठविली जाणार आहे.