मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2023 (21:23 IST)

शिर्डी : गुरुपौर्णिमेनिमित्त भक्ताकडून २० लाखाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण

शिर्डीच्‍या साईबाबांना गुरू मानणारे लाखो साईभक्त आज गुरुपौर्णिमेनिमित्त साई चरणी नतमस्तक झाले. गुरूपोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका स्थित आंध्रप्रदेश येथील साईभक्‍त वामसी कृष्‍णा विटला यांनी साईबाबांना अनोखी गुरुदक्षिणा दिली आहे. ३५५ ग्रॅम वजनाचा २० लाख रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट वामसी कृष्‍णा यांनी साईचरणी अर्पण केला.
 
गुरुपौर्णिमेनिमित्त आंध्रप्रदेश येथील साईभक्‍त वामसी कृष्‍णा विटला यांनी २० लाख रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला. दुपारच्या आरतीवेळी हा सोन्याचा मुकुट साईबाबा संस्थानकडे सुपुर्द करण्यात आला. वामसी कृष्‍णा आणि त्यांच्या परिवाराच्या इच्छेखातर हा मुकुट आज साईबाबांच्या मुर्तीला परिधान करण्यात आला.
 
साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांचे हस्ते वामसी कृष्णा आणि परिवाराचा सत्कार करण्यात आला. वामसी कृष्णा विटला हे बालपनापासून निस्सीम साईभक्त असून ते सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून त्यांनी साईबाबांना सुवर्ण मुकुट अर्पण केल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor