सोमवार, 22 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2020 (16:54 IST)

शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

Shiv Sena corporator dies due to corona
मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हरिश्चंद आंमगावर यांना आठवड्यापूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आठवड्यापूर्वी  आंमगावकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना ठाणे येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांवर उपचार सुरु होते. 
 
दरम्यान त्यांच्या पत्नीला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला होता. तरर भाऊ आणि आई हे अद्यापही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.  हरिश्चंद्र आंमगावकर हे मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये दोन टर्म नगरसेवक होते. तर या अगोदर त्यांनी मीरा भाईंदर महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष पद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते म्हणून होते. तर आमदार प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख जात होते.