मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 (11:05 IST)

शिवसेनेला फार मोठी किंमत मोजावी लागेल : गडकरी

महाराष्ट्रातील शिवसेना आणि काँग्रेसची युती फार काळ टिकणार नाही. आगामी दिवसांमध्ये शिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी हे भाष्य केले. 
 
शिवसेनेने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात मते मागितली होती. त्यामुळे जनतेने शिवसेना आणि भाजप या दोघांना मत दिले होते. तरीही केवळ मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडणे, हे जनतेला रुचणार नाही. तसेच शिवसेना कायम बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या हिंदुत्वाचा दाखला देत असते ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य नाही. त्यामुळे शिवसेना-काँग्रेसच्या युतीला सैद्धांतिक आधार नाही, ही संधीसाधू युती आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात आहे, अशी टीका गडकरी यांनी केली.