शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (11:06 IST)

पी. चिदंबरम यांनी आमच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले - नितीन गडकरी

काँग्रेस नेते पी. चिदमंबरम यांनी गृहमंत्री असताना माझ्या तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले, असं मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.
 
"आम्ही कधीच सूडाच्या भावनेनं राजकारण केलं नाही. उलट काँग्रेसच्या काळात पी. चिदंबरम गृहमंत्री असताना त्यांनी आमच्याविरोधात (मी, नरेंद्र मोदी आणि अमित शाह) खोटे गुन्हे दाखल केले. पण, काही कालावधीनंतर आम्ही निर्दोष सुटलो," असं गडकरींनी म्हटलं आहे.
 
पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केल्यानंतर काही तासातच गडकरींनी हे वक्तव्य केलं.