मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 जून 2022 (08:31 IST)

कोल्हापुरातील शिवसेनेचे आमदार आबिटकर गेले कुठे?

prakash abitkar
कोल्हापूर:- राज्यात महाविकासआघाडी मध्ये भूकंप होत असून शिवसेनेचे काही आमदार नॉटरिचेबल आहेत. ते गुजरात मधील सुरत येथे एका हॉटेलात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये कोल्हापुरातील राधानगरीचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे देखील मंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
 
दरम्यान, मराठवाडा, कोकण, ठाण्यातील किमान वीस आमदारांसह शिवसेनेचे नगर विकास मंत्री तसेच ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे हे थेट काल रात्री सायंकाळपासून नॉट रिचेबल असून ते थेट गुजरातच्या सुरतमधील हॉटेल मेरिडिअनमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर हे सर्व आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर कोल्हापूरचे शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर हे ही नॉट रिचेबल असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर आबिटकरांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते तेंव्हा पासून नाराज होते, असे बोलले जात आहे. सध्या प्रकाश आबिटकर हे एकनाथ शिंदेंसोबत सुरतमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे.