बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (08:00 IST)

शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची ईडीकडून सुमारे आठ तास चौकशी

शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकरणी वायकर यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली आल्याचे समजते.
 
रविंद्र वायकर हे मंगळवारी दुपारच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर तब्बल ८ तास त्यांची ईडी कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. ८ तास शिवसेना आमदार रविंद्र वायकर हे ईडीच्या प्रश्नांना सामोरे गेले. त्यांना नेमके कोणत्याप्रकरणी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
 
रविंद्र वायकर हे माजी मंत्री होते. गेल्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. रविंद्र वायकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. त्याच्या ईडी चौकशीचे नेमके कारण काय होते, यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र अद्यात या चौकशीबाबात कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे.